सदर वेब पोर्टलवर आपण ऑनलाइन पद्धतीने आपले नाव आणि तपशील भरून बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या कार्यालयाकरिता कंत्राटदार परवाना मागणीसाठी अर्ज करू शकता. अधिक माहितीसाठी खाली वाचा किंवा बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधा.
"बांधकाम विभागात कंत्राटदार परवाना नोंदणी करणे इथून पुढे अधिक सोयीस्कर होईल."
मा. .श्री. संतोष धनंजयराव जोशी
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि प कोल्हापूर
"कंत्राटदरांची सर्व र्माहिती डीजीटल पद्धतीने उपलब्ध होईल."
मा. श्री. अभिजीत पाटील
कक्ष अधिकारी, बांधकाम, जि प कोल्हापूर
"परवान्याची स्थिती ईमेल द्वारे कळविल्याने, कंत्राटदारांना वारंवार कार्यालयात येण्याची गरज नाही."
मा. श्री. अमर माळी
कनिष्ट सहाय्यक, बांधकाम, जि प कोल्हापूर
नाविन्यपूर्ण
वैशिष्टे
ऑनलाइन
नोंद
अभियंत्याची
माहिती
पात्रता
प्रमाणपत्रे
माहिती
पडताळणी
नोंदणी
प्रक्रिया
अधिकृत
परवाना
कंत्राटदाराचे ऑनलाइन प्रोफाईल, परवाना,
कामांची माहिती आणि बरेच काही...
कंत्राटदार परवाना नोंदणी व सबंधित माहिती
कंत्राटदार आपली योग्य माहिती भरून नवीन परवाना नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज भरू शकतात
ऑनलाइन लॉगीन तयार करणे
स्वत: चा अधिकृत ई मेल, मोबाईल नंबर व अपेक्षित पासवर्ड पुरवून, ईमेल वर आलेला OTP (One Time Password) पडताळून झाल्यावर कंत्राटदारचे अधिकृत लॉगीन तयार होईल.
अभियंत्याने स्वत:ची माहिती भरणे
वेब पोर्टल मध्ये लॉगीन केल्यानंतर, फॉर्म वर स्वत:ची तपशीलवार योग्य माहिती भरणे व पुढील बटन वर क्लिक करणे.
सबंधित कागदपत्रे अपलोड करणे
माहिती भरून झाल्यावर पात्रता प्रमाणपत्रे व इतर सबंधित कागदपत्रे यांची स्कॅन केलेले PDF स्वरूपातील फाइल्स अपलोड करणे.
माहिती व कागदपत्रे पडताळणी
माहिती व अपलोड केलेली कागदपत्रे प्रशासकीय कार्यालायाकडून तपासली जातील, काही त्रुटी असल्यास, सबंधित कंत्राटदारास ईमेल द्वारे कळविले जाईल. त्रुटी असलेली माहिती, कागदपत्रे पुन्हा अपलोड करावी लागतील.
चलन व नोंदणी शुल्क
माहिती व कागदपत्रे पडताळणी यशस्वीपणे पडताळून झालेची सूचना मिळालेवर, प्रशासकीय कार्यालयाकडून चलन घेऊन नोंदणी शुल्क जमा केलेची पावती स्कॅन करून, PDF स्वरूपातील फाइल वेब पोर्टल वर अपलोड करणे.
नोंदणी प्रक्रिया व परवाना
नोंदणी शुल्काची पावती पडताळून, माहितीची व नोंदणीची प्रक्रिया तपासून पूर्ण केली जाईल. सर्व गोष्टींची पूर्तता करून घेतल्यावर कार्यालया कडून कंत्राटदारास परवाना उपलब्ध करून दिला जाईल.
परवाना नोंदणी साठीचे हे वेब पोर्टल पहिल्या टप्प्यात मुख्यता सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्या परवाना नोंदणीसाठी उपलब्ध कलेले आहे. त्याचे सबंधित परवाना प्रकार हे खालील प्रमाणे,